करोना नियमावलीचे उल्लंघन...बड्या मंत्र्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

करोना नियमावलीचे उल्लंघन...बड्या मंत्र्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

 


कोल्हापूर -  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजयी उमेदवार राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि त्यांच्या चारशे ते पाचशे कार्यकर्त्यावर करोना नियमांचा भंग करून जंगी मिरवणूक काढल्याबद्दल जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा बँकेच्या शिरोळ सेवा संस्था गटात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत मंत्री यड्रावकर यांनी शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचा पराभव केला. त्याबद्दल शनिवारी जयसिंगपूर येथील क्रांती चौक गल्ली क्रमांक सहा दरम्यान यड्रावकरांची जंगी विजयी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण केली करोनाचे नियम डावलून मिरवणूक काढल्याबद्दल सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर पोलिसांनी करोनाचे नियम डावलून मिरवणूक काढल्याप्रकरणी राज्यमंत्री यड्रावकर, त्यांचे बंधू व माजी उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, राहुल बंडगर, रोहित पाथरवट,  यांच्यासह सुमारे पाचशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post