नगर, राहुरी तालुक्यातील ‘या’ सोसायट्यांवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेंचे वर्चस्व

नगर तालुक्यातील उक्कडगाव सेवा सोसायटी व राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे सेवा सोसायटी वर मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे वर्चस्व नगर - विविध सहकारी सेवा सोसायट्या या शेतकऱ्यांच्या दुवा आहेत केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचे काम सेवा सोसायटीमार्फत केले जाते.सेवा सोसायटी यांच्यामार्फत जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना कर्ज रुपये अर्थसहाय्य केले जाते.कमी व्याजदरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्यास मदत होत असते.असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

       नगर तालुक्यातील उक्कडगाव सेवा सोसायटी व राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे सेवा सोसायटी वर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या गटाचे उमेदवार निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, सरपंच सर्जेराव घाडगे,जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप गीते, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मारुती नालकर यांच्या प्रयत्नाने तसेच श्री माधव नरोडे दत्तात्रय गीते यांच्या नेतृत्वाखाली चिंचविहिरे तालुका राहुरी सेवा  संस्थेवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले गटाचे वर्चस्व स्थापन झाले.


श्री दगडू गीते,मारुती नालकर बाळासाहेब नरोडे,बबन धामोरे, उत्तम साळवे,शिवाजी गीते, बाबुराव पठारे,गीताराम कोते, नामदेव पानसंबळ,संजय नालकर, सरस्वती नालकर, भागीरथीबाई झांबरे,अनिल राऊत,चांगदेव नालकर,गवराज झांबरे,रामनाथ गिते हे निवडून आले.
         उक्कडगाव सेवा सहकारी सोसायटी वर आमदार कर्डिले गटाचे वर्चस्व बाळासाहेब किसनराव म्हस्के, जयसिंग तबाजी म्हस्के,भगवान म्हस्के,सुरेश म्हस्के,चंद्रकांत शिंदे, मारुती तीपुळे, राजू साठे, रामसिंग शेळके,शोभा मस्के, सुमन सावंत,दत्तात्रय पवार, नारायण शिंदे,बाळासाहेब कांबळे हे सदस्य म्हणून निवडून आले
सरपंच नवनाथ म्हस्के तसेच भिमाजी मोटे,सावंत गुरुजी, संजय म्हस्के सर,भगवान शिंदे, यांनी परिश्रम घेतले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post