येत्या काळात नरेंद्र मोदी राष्ट्रपती व योगी आदित्यनाथ पंतप्रधान बनतील...

येत्या काळात नरेंद्र मोदी राष्ट्रपती व योगी आदित्यनाथ पंतप्रधान बनतील...

 


भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत हे मागील एक ते दीड वर्षांपासून सतत चर्चेत आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व टिकैत यांनी केली.  अनेक कार्यक्रमांमधून केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या टिकैत यांनी आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधलाय.

टिकैत हे सोमवारी आजतक या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिकैत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांना योगी पुन्हा मुख्यमंत्री होतील का असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला खोचक पद्धतीने उत्तर देताना, “अरे त्यांना पंतप्रधान बनवा हरकत नाही. हे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडतील आणि राष्ट्रपती बनतील. योगी नवे पंतप्रधान होतील. आपला (उत्तर) प्रदेश रिकामा होईल, येथे इतर कोणी तरी नेतृत्व करेल,” असं टिकैत यांनी म्हटलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post