राज्यात करोनाचा पुन्हा विस्फोट, कडक निर्बंधाबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार अंतिम निर्णय

राज्यात करोनाचा पुन्हा विस्फोट, कडक निर्बंधाबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार अंतिम निर्णय मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात गेला आहे. लॉकडाऊन किंवा रात्रीच्या संचारबंदीसारखे कठोर निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतरच घेण्याची भूमिका मुख्यमंंत्री ठाकरे यांनी घेतल्याचे समजते. दरम्यान, मुख्य सचिव देबशीष चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त आणि जिल्हाधिका-यांच्या मॅरेथॉन बैठकीत राज्यभरातील स्थितीचा आढावा घेण्यात आला.


मुंबई महानगरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदीसारख्या कठोर उपाययोजनांची चर्चा सुरू आहे. निर्बंधांच्या संदर्भातील एक प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठविण्यातही आला होता. मात्र, लॉकडाऊन किंवा निर्बंधांबाबत राष्ट्रीय पातळीवर निकष असायला हवेत, अशी भूमिका राज्याची आहे. त्यामुळे अगदी विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही पंतप्रधानांसोबतच्या चर्चेनंतर अथवा केंद्राकडून स्पष्टता आल्यानंतर घेण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post