नगर जिल्ह्यात एस.टी.बसवर दगडफेकीचे प्रकार चालूच...कामावर पतरणारे कर्मचारी धास्तावले

नगर जिल्ह्यात एस.टी.बसवर दगडफेकीचे प्रकार चालूच...कामावर पतरणारे कर्मचारी धास्तावले नगर : राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेसवर कोपरगाव येथे दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. दोन्ही बसेसच्या समोरील काचांवर ही दगडफेक करण्यात आली असून हल्लेखोर पसार झाले आहेत. 

  कोपरगाव आगाराची बस क्रमांक एम एच १३ सीयू ८४८९ ही बस आरटीओ कामासाठी कोपरगावहून श्रीरामपूरकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र दोन किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाजवळ अज्ञाताने बसवर दगडफेक करून काच फोडली असून हल्लेखोर बाजूच्या ऊस शेतीतून पसार झाले आहेत. चालक सानप आणि वाहक गरकल यांनी या घटनेची माहिती तातडीने आगार प्रमुख अभिजित चौधरी यांना दिली. दुसऱ्या घटनेत एम एच १४ बिटी २४६० वैजापूर-कोपरगाव ही एसटी बस दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान कोपरगाव बस स्थानकातून वैजापूरला जाण्यासाठी मार्गस्थ झाली. मात्र एक किलोमीटर अंतरावर कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नरच्या पुढे गेल्यानंतर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञान इसमांनी बसवर दगडफेक केली. यावेळी बसमध्ये चालक एस. एस गायकवाड आणि वाहक एस. के. भागवत तसेच १३ प्रवासी प्रवास करत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post