किरण काळेंची महामंडळावर वर्णी लावण्याची मागणी, कार्यकर्त्यांचे मंत्री थोरातांना निवेदन

 किरण काळेंची महामंडळावर वर्णी लावण्याची मंत्री ना.बाळासाहेब थोरातांकडे काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी ; 

मनपावर काँग्रेसचा झेंडा आम्ही फडकवून दाखवू, शहर विकासासाठी काळेंना राजकीय बळ द्या - कार्यकर्त्यांची मागणीनगर : किरण काळे उच्चशिक्षित आहेत. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. नगर शहर मागील अनेक दशकांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. शहराला सुसंस्कृत, उच्चशिक्षित व विकासाची दृष्टी असणाऱ्या निर्भीड नेतृत्वाची आज नितांत गरज आहे. त्यादृष्टीने किरणभाऊ यांचे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हात बळकट करण्यासाठी त्यांची महत्त्वाच्या महामंडळावर वर्णी लावण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 


ना.थोरात यांनी या मागणीला प्रतिसाद देत काळे यांची महामंडळावर वर्णी लावल्यास नगर शहरात काँग्रेसला ऊर्जा मिळू शकते.  

किरण काळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी ना. बाळासाहेब थोरात व क्रीडा, पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री ना.सुनील केदार, आ.संग्राम थोपटे हे हेलिकॉप्टरने नगरला आले होते. यावेळी ना.केदार यांनी काळे यांच्या अंगाला गुलाल लागलेला आम्हाला पाहायचा आहे असे म्हणत काळे यांना शहराचे सर्वेसर्वा करण्याची काँग्रेसची तयारी सुरू असल्याचे वक्तव्य केले होते. या सोहळ्याचे शुभेच्छा फलक लावताना कार्यकर्त्यांनी काळे यांचा "भावी आमदार" असा उल्लेख केला होता.  तेव्हाच अनेकांच्या भुवया शहरात उंचावल्या होत्या. त्यातच काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे यांची महामंडळा वर्णी लावण्याची मागणी केल्यामुळे काँग्रेस पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे.


ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, निजाम जहागीरदार, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रविण गिते, शहर जिल्हा सरचिटणीस ॲड.अजित वाडेकर, युवक काँग्रेसचे विशाल घोलप, ओम नऱ्हे, महिला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष उषा भगत, राणी पंडित, भिंगार काँग्रेसचे सागर चाबुकस्वार आदींसह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मागणीचे निवेदन ना.थोरात यांना पाठविले आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरामध्ये दहशतीच्या अनिष्ट प्रवृत्तींच्या विरोधात काँग्रेस पक्षाला लढावे लागते. ही लढाई अत्यंत संघर्षाची आहे. मात्र या संघर्षाच्या लढाईमध्ये किरणभाऊ यांच्यासारखे निर्भीड नेतृत्व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बरोबर असल्यामुळे नगर शहरामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा महानगरपालिकेवर निश्चितपणे फडकेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post