जिल्हा परिषदेच्या महिला सदस्याची बांधावरील बांधिलकी....थेट वाफ्यात उतरुन केली कांदा लागवड

जिल्हा परिषदेच्या महिला सदस्याची बांधावरील बांधिलकी....थेट वाफ्यात उतरुन केली कांदा लागवडनगर (सचिन कलमदाणे): शेवगाव तालुक्यातील जि.प.सदस्या हर्षदा काकडे या कायम सर्वसामान्यांमध्ये रमणार्‍या लोकप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात. वाड्या वस्त्यांवर जावून संवाद साधत, लोकांची सुखदु:ख वाटून घेण्याचे काम त्या सातत्याने करतात. शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतीवाडीच्या कामांचीही त्यांना चांगली माहिती आहे. अशाच दौर्‍यात त्यांनी शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथे कार्यक्रमानिमित्त गेल्या असता त्यांना काही महिला शेतात कांदा लागवड करताना दिसल्या. ते पाहून काकडे यांनाही रहावले नाही व त्यांनी थेट वाफ्यात उतरुन महिलांसमवेत कांदा लागवड केली. भल्या सकाळी थंडीत या महिला शेतात काबाडकष्ट करताना पाहून काकडे भारावून गेल्या व त्यांनीही कांदा लागवड करून शेतकरी महिलांशी संवाद साधला.

1/Post a Comment/Comments

  1. मत मिळविण्याचा खटाटोप

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post