93 वेळा पराभूत होवूनही पुन्हा रिंगणात उतरणार...100 वेळा पराभूत होण्याचे ध्येय ठेवणारा अवलिया


 ९३ वेळा पराभूत...१०० निवडणुकींमध्ये पराभूत होण्याचं लक्ष्य... उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये एकीकडे अनेक उमेदवार निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरत असताना एक व्यक्ती मात्र पराभव व्हावा म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार करतोय. विशेष म्हणजे या व्यक्तीने आतापर्यंत ९३ वेगवेगळ्या निवडणुका लढल्यात. या सर्व निवडणुकांमध्ये त्याचा पराभव झालाय. मात्र तरीही त्याने ९४ व्यांदा निवडणूक अर्ज करण्याची तयारी सुरु केलीय. या व्यक्तीला १०० वेळा निवडणुकीमध्ये परभूत होण्याचा विक्रम करायचाय. काय धक्का बसला ना वाचून? पण हे खरं आहे. या व्यक्तीचं नाव आहे हसनू राम. मला यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्येही पराभूत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, असं हसनू राम यांनी म्हटलंय.

समोर आलेल्या माहितीनुसार ९३ वेळा पराभूत झाल्यानंतर हसनू राम हे त्याच उत्साहाने निवडणुकीचा अर्ज करणार आहेत. ही हसून यांची उमेदवार म्हणून ९४ वी निवडणूक असणार आहे. मात्र यंदाही आपल्याला पराभूत होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, असा दावा हसनू यांनी केलाय. आपण १०० निवडणुकींमध्ये पराभूत होण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. हा विक्रम मला माझ्या नावावर करायचा आहे, असं हसनू सांगतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post