पीएम किसान साठी 'ई-केवायसी' ३१ मार्च २०२२ पर्यंत करणे बंधनकारक

 पीएम किसान साठी 'ई-केवायसी' ३१ मार्च २०२२ पर्यंत करणे बंधनकारक



नगर - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना एप्रिल-जुलै २०२२ च्या मदती पूर्वी ३१ मार्च २०२२ पर्यंत 'ई-केवायसी' पूर्ण करणे बंधनकारक   असल्याचे,जिल्हा समन्वय अधिकारी ( पी एम किसान )तथा  निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित  यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

विशेष जनजागृती मोहिम राबवून   राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत.


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान ) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील Farmer Corner या टॅब मध्ये किंवा पी. एम. किसान अॅपद्वारे ओटीपी प्राप्त करून लाभार्थीना स्वतः ई-केवायसी   प्रमाणीकरण मोफत करता येईल.


ग्राहक सेवा केंद्रावर ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा  केंद्रावर बायोमॅट्रिक पद्धतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करण्या साठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर रु. 15 फक्त निश्चित करण्यात आले आहे.अशी माहिती  ही प्रसिद्धी पत्रकात दिली  आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post