छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान 



महाराष्ट्र सदन कथित  घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही याचिका दाखल केली आहे. 

महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी ९ सप्टेंबरला छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर अंजली दमानिया यांनी हायकोर्टात जाणार असल्याचं सांगितलं होतं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post