करोनाचा उद्रेक... राज्यात शाळा बंद, रात्री संचारबंदी...नवे निर्बंध लागू


करोनाचा उद्रेक... राज्यात शाळा बंद, रात्री संचारबंदी...नवे निर्बंध लागू



 मुंबई : राज्यात वाढता कोरोनाचा प्रसार पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. खरंतर या नव्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांनी याबाबत पाठवलेल्या अहवालावर निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अखेर नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.

राज्यातील हाँटेल आणि रेस्टाँरंट रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद. दिवसा ५० % क्षमतेने सुरू रहणार.

राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आलीय. दिवसा ५ पैक्षा अधीक लोकांना एकत्र येता येणार नाही.

रात्री फक्तं अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार.

रात्री 11 ते सकाळी 5 कर्फ्यू

>> मैदानं, उद्यानं पर्यटन स्थळ बंद

>> शाळा, कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

>> थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार

>> सलून आणि खासगी कार्यलय 50 टक्के क्षमतेनं सुरु

>> पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसनं वाहतूक करण्यास मुभा

>> हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

>> स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णपणे बंद

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post