भाजपचे आमदार आशिष शेलारांना धमकी देणारा अटकेत

 आमदार आशिष शेलारांना धमकी देणारा अटकेतमुंबई : राज्यातील नेते मंडळींना धमकीचं सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आता भाजपचे आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनाही जीवे मारण्याची धमकी  देण्यात आलीय. शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रारही केली आहे. त्यानंतर शेलार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केलीय. गुन्हे शाखा आता आरोपीला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती मिळतेय.आशिष शेलार यांनी अनोळखी नंबरच्या फोनवरुन धमकी आल्याची माहिती पत्राद्वारे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. दोन वेगवेगळ्या फोन वरुन आशिष शेलार यांना धमकी देण्यात आल्याचं देखील कळतंय. शेलार यांना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच परवाच्या दिवशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर शेलार यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. त्यानंतर आता शेलार यांना धमकी देणाऱ्याला मुंबईच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.ओसामा समशेर खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याचं वय 48 वर्षे आहे. गुन्हे शाखा आता या आरोपीला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती मिळतेय. शेलार यांच्या वतीनं वांद्रे पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला होता. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीचा जमिनीबाबतचा एक वाद आहे आणि या वादामागे आशिष शेलार यांचा हात असल्याचा संशय या आरोपीला होता. त्यातूनच त्याने शेलार यांनी धमकी दिल्याचं सांगितलं जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post