नगर तालुक्याला हवा हक्काचा आमदार...कर्डिले म्हणाले लवकरच योग जुळुन येईल....

 पद्मश्री पोपटराव पवार  ; जितेंद्र निकम योगेश गुंड  बाळासाहेब गदादे आदिनाथ शिंदे अविनाश मंत्री यांना बाजार समितीचे आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान


 

 नगर -सध्या सोशल मिडीया व डिजीटल मिडीयाच्या आक्रमणातही प्रिंट मिडीयाने आपली विश्वासहर्ता जपली आहे . निगेटिव्ह बातम्या समाजमन दुखावतात यामुळे सामाजीक स्वास्थावर त्याचा विपरीत परिणाम होतो . म्हणुन सकारात्मक बातम्यांनी सामाजीक स्वास्थ सुधारण्याचे आव्हान पत्रकारांनी स्विकारावे असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले .

स्व . दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त लोकमतचे योगेश गुंड तसेच दिव्य मराठीचे पत्रकार जितेंद्र निकम, पुण्यनगरीचे बाळासाहेब गदादे,  दिव्य मराठीचे अविनाश मंत्री, नगर स्वतंत्रचे आदिनाथ शिंदे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . तसेच बाजार समितीच्या वतीने पवार यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला .यावेळी पवार बोलत होते.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले होते . यावेळी बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे , उपसभापती संतोष म्हस्के , माजी उपसभापती रेवणनाथ चोभे , भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश सुंबे आदि उपस्थीत होते .  
यावेळी कर्डिले म्हणाले की नगर तालुक्यासारख्या दुष्काळी भागातही गुणवंत पत्रकार तयार होत आहे . ग्रामीण भागातील समस्यांसोबत शेतकऱ्यांसंबधीत बातम्या देऊन ते राजकीय नेत्यांना नेहमी सजग करीत आले .


यावेळी जितेंद्र निकम , लहुकुमार चोभे यांचेही भाषणे झाली . प्रास्तावीक बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केले .स्वागत रेवणनाथ चोभे यांनी तर आभार संचालक बाबासाहेब खर्से यांनी मानले . सुत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले .
 यावेळी बाजार समितीचे संचालक बन्सी कराळे, बाळासाहेब निमसे , बबनराव आव्हाड , उध्दव कांबळे , बाबासाहेब जाधव , संतोष कुलट , बाळासाहेब निमसे , शिवाजी कार्ले, बहिरू कोतकर , केशव आडसुरे , छ्त्रपती बोरूडे, सरपंच रावसाहेब कर्डीले, सरपंञ बाबासाहेब काळे, बाळासाहेब म्हस्के , पंचायत समिती सदस्य दिपक कार्ले, प्रकाश पालवे , अमित आव्हाड , माजी सभापती अशोक झरेकर , वसंत शिंदे , प्रंशात गहिले , शुभम भांबरे , बबन हराळ , आण्णासाहेब मगर , नगर कारखान्याचे माजी संचालक हरीभाऊ निकम , भाजपचे उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे , उपसरपंच बंडू पवार आदि उपस्थीत होते .

 नगर तालुक्याला हवा 
हक्काचा  आमदार
नगर तालुक्याला हक्काचा आमदार नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते यामुळे कर्डिले यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवुन हि उणिव भरून काढावी अशी अपेक्षा अनेकांनी भाषणातुन व्यक्त केली . कर्डिले यांनीही आपल्या भाषणातुन हा धागा पकडला ते म्हणाले सगळी तयारी केली होती सगळे मनासारखे घडत होते मात्र ऐनवेळी निवडणूक पुढे ढकलल्याने आता शांत बसावे लागले . योग असेल तर नक्कीच हि इच्छा पुर्ण होईल असे त्यांनी स्पष्ट केले .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post