नगर, राहुरी तालुक्यातील 'या' तलावांची दुरुस्ती, २ कोटी २२ लाखांचा निधी मंजूर


नगर, राहुरी तालुक्यातील या तलावांची दुरुस्ती, २ कोटी २२ लाखांचा निधी मंजूरनगर:  राहुरी मतदारसंघातील व तालुक्यातील ताहाराबाद, वांबोरी, धामोरी खु., गुहा, चिंचाळे, कनगर, रामपूर तसेच नगर तालुक्यातील बहिरवाडी व इमामपूर येथील पाढर तलावांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाने रु.2 कोटी 22 लाख 5 हजार रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे राज्याचे नगरविकास उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

ना. तनपुरे म्हणाले, मतदार संघातील राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणार्‍या पाझर तलाव दुरुस्तीसाठी ताहाराबाद (19 लाख 81 हजार), वांबोरी (30 लाख 4 हजार), वांबोरी राऊत वस्ती (7 लाख 32 हजार), धामोरी खु.(14 लाख 6 हजार), गुहा खपके वस्ती (5 लाख 98 हजार ), चिंचाळे गडधे आखाडा (3 लाख 50 हजार ), कनगर घाडगे वस्ती (3 लाख 59 हजार ), रामपूर सरोदे वस्ती (4 लाख 77 हजार), रामपूर साबळे वस्ती (5 लाख 53 हजार ) तसेच नगर तालुक्यातील बहिरवाडी काळेवस्ती (28 लाख 61 हजार), बहिरवाडी वाकी वस्ती (48 लाख 43 हजार), इमामपूर महादेव मंदिर रस्ता (26 लाख 85 हजार), इमामपूर पालखीचा ओढा (23 लाख 56 हजार), येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी एकूण 2 कोटी 22 लाखांचा निधी जिल्हा परीषद मालकीचे पाझर तलावांना मंजूर झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post