आरोग्य यंत्रणेवर ताण... डॉक्टर करोना बाधित होण्याचं प्रमाण वाढले


आरोग्य यंत्रणेवर ताण... डॉक्टर करोना बाधित होण्याचं प्रमाण वाढले 



 मुंबई:  विळख्यात राज्यातील निवासी डॉक्टरही सापडले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 291 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.  

जे.जे. रुग्णालयात आत्तापर्यंत 59 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. तर नायर रुग्णालयात 40,  केईएममध्ये 40 डॉक्टरांना कोरोनाची लागण झालीय. काही जणांना डिस्चार्ज मिळाला असला तरी अद्याप


 विलगीकरणात आहे. नायर रुग्णालय 45, केईएम 60, ठाणे 8, धुळे 8, कुपर 7, पुण्यातील ससून रुग्णालय 5, मिरज 2, लातूर, औरंगाबाद, नागपूर  येथील प्रत्येकी एका निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे.  मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टर कोरोनाबाधित होत असल्याने पुढील पाच ते सहा दिवस जिकरीचे  ठरणार आहे.  कंत्राटी पद्धतीच्या डॉक्टरांच्या नेमणुकीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण पडणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post