मित्रासाठी राष्ट्रवादी आमदाराचा पोलिस ठाण्यात राडा... पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी

 

मित्रासाठी राष्ट्रवादी आमदाराचा पोलिस ठाण्यात राडा... पोलिसांना शिवीगाळ व दमदाटीभंडारा:  जिल्ह्यातील तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू कारेमोरे यांच्या व्यापारी मित्रांना पोलिसांनी  मारहाण केल्यामुळे आमदार कारेमोरे यांनी थेट पोलिस स्टेशन गाठत धिगांना घातला असून आमदारांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.

आमदार राजू कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे काल रात्री 9 वाजेच्या दरम्यान आमदारांच्या घरून 50 लक्ष रुपयांची रोकड चारचाकी वाहनातून तुमसर कडे घेऊन जात असताना मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्टँग रूम च्या बंदोबस्ता करता तैनात असलेल्या पोलिसांनी रस्त्यावरील एका वळणात चालकाने इंडिकेटर का दिले नाही? म्हणून दुचाकी वाहनाने गाडीचा पाठलाग करीत वाहनास अडविले.


गाडीत असलेल्या यासीम छावारे आणि अविनाश पटले या आमदारांच्या दोन मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. आपणांस मारहाण करून जवळील 50 लक्ष रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चैन पोलिसांनी गहाळ केल्याची तक्रार फिर्यादी यासीम छावारे यांनी मोहाडी पोलिसात दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस च्या आमदाराचा पोलिसांना अश्लील शिवीगाळ करीत दमदाटी करीत असल्याचा व्हिडियो सध्या जिल्हात वायरल झाला असून सर्व स्तरातून आमदारांवर टीका केली जात आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post