चिंता वाढली... २४ तासात महाराष्ट्रातील करोना बाधितांंची संख्या धडकी भरवणारी...


चिंता वाढली... २४ तासात महाराष्ट्रातील करोना बाधितांंची संख्या धडकी भरवणारी... मुंबई: महाराष्ट्रात लॉकडाउन लागू केला जाणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं असलं, तरी गर्दी नियंत्रित करणारे कठोर निर्बंध घातले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू होण्याची शक्यता वाढलेली आहे. त्यातच बुधवारी दिवसभरात तब्बल २६ हजार ५३८ नव्या करोनाबाधितांची भर राज्याच्या एकूण आकड्यामध्ये झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या अॅक्टिव्ह करोनाबाधिताचा आकडा आता ८७ हजार ५०५ इतका वाढला आहे. त्यासोबतच राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण बाधितांचा आकडा देखील तब्बल ७९७ वर गेल्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.


आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात वाढ झालेल्या बाधितांमुळे आजपर्यंत राज्यात आढळलेल्या एकूण बाधितांचा आकडा ६७ लाख ५७ हजार ०३२ इका झाला आहे. त्यापैकी ८७ हजार ५०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post