ओबीसी-व्हीजे-एनटी या वंचित समाजाने लढ्यासाठी सज्जा रहा

 ओबीसी-व्हीजे-एनटी या वंचित समाजाने लढ्यासाठी सज्जा रहा-बाळासाहेब सानपनगर - ओबीसी-व्हीजे-एनटी आरक्षणाबाबत निर्मांण झालेली दुर्दैवी अवस्था लक्षात घेता महाराष्ट्रात संबंध ओबीसीला प्रचंड ताकदीने संघटीत व्हावे लागेल, त्यासाठी जनमोर्चाच्या प्रत्येकाने ओबीसी-व्हीजे-एनटी चे संघटन मजबूत करावे, असे आवाहन  ओबीसी-व्हीजे-एनटी जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी अहमदनगर येथे केले.
पुण्याकडे जातांना श्री.सानप यांनी नगरला सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री.सानप यांचा वाढदिवसानिमित्त जनमोर्चाच्या नगर शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना त्यांनी वरील आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनमोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ होते.


सद्याचा काळ हा ओबीसीसाठी अत्यंत महत्वाचा असून, आपली संघटीत ताकद अधिक मजबूत करावी व पुढे येणार्‍या लढ्यासाठी सज्ज रहावे, असा पुर्नउच्चार श्री.सानप यांनी आपल्या भाषणाच्या समारोपात केला.
टिळकरोड, शुभम मोबाईल शो-रुम येथे झालेल्या या सत्कारप्रसंगी जनमोर्चा जिल्हाध्यक्ष सुनिल भिंगारे, पदाधिकारी सौ.वनिता बिडवे, सुशिला सहानी, राजेंद्र पडोळे,नईम शेख, सरफरोज जहागिरदार, फिरोज शफी खान, शशिकांत पवार, विनोद पुुंड, श्रीकांत मांढरे, रमेश सानप, अनिल इवळे आदि उपस्थित होते.
प्रारंभी फटाक्याची आतषबाजीने श्री.सानप यांचे स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post