पालकमंत्री कधी बदलणार? हसन मुश्रीफ म्हणतात...

 

पालकमंत्री कधी बदलणार? हसन मुश्रीफ म्हणतात....नगर: अहमदनगर जिल्हा नियोजन समितीची सभा आज ऑनलाईन पद्धतीने झाली. यात पालकमंत्री हसन मुश्रीफ ऑनलाईन सहभागी झाले. त्यानंतर आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पालकमंत्री बदला बाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, माझ्याकडे पक्षाने कोल्हापूरची जबाबदारी दिली आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्याचेही पालकमंत्रीपद माझ्याकडे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे मीच पक्षश्रेष्ठींकडे तीन-चार महिन्यांपूर्वी पालकमंत्रीपद बदलण्याची मागणी केली होती.

ते पुढे म्हणाले की, सध्या तरी मीच अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पालकमंत्री बदलाची मीही वाट पाहतोय. पालकमंत्रीपद राहिलच तर 26 जानेवारीला ध्वजारोहण कार्यक्रमाला हजर राहील. पालकमंत्रीपदी नाही राहिलो तरीही जिल्ह्यात तुम्हा लोकांना भेटायला येईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post