महाराष्ट्रात सोनं चांदी होणार स्वस्त, सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत

 

महाराष्ट्रात सोनं चांदी होणार स्वस्त, सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीतमुंबई: सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. इतर राज्यांच्या तुलनेत आपली कर प्रणाली सुधारण्याच्या उद्देशाने आणि महसूल वाढीसाठी महाराष्ट्र सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील सोने आणि चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा विचार करत आहे. एबीपी माझाने सदर वृत्त दिले आहे.


हवाईमार्गे आयात केलेल्या सोन्यावर महाराष्ट्र सरकार ०.१ टक्के मुद्रांक शुल्क आकारत आहे. तर, इतर राज्यांमध्ये हे शुल्क नसल्याने इतर राज्यांमध्ये सोन्याची आयात होत आहे. परिणामी राज्यातील सोने आयातीच्या प्रमाणात घट झाली असल्याचे दिसून आले आहे. सोने आयातीवर असलेल्या जीएसटीमुळे आधीच राज्य सरकारच्या महसूलावर परिणाम होत आहे. सोन्यावरील मुद्रांक शुल्कात सवलत दिल्यास राज्याच्या महसुलात वाढ होऊ शकते, असे सूत्रांनी म्हटले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post