उर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदार संघात महावितरणचा कर्मचारी , 'एसीबीच्या' जाळ्यात

राज्य उर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदार संघात महावितरणचा कर्मचारी , 'एसीबीच्या' जाळ्यात


 


 तक्रारदार- पुरुष  वय- ४२,   रा- हिंगणगावणे, ता- शेवगांव   जि.अहमदनगर

आरोपी =१) बाळासाहेब पांडुरंग टिमकरे, वय ४३, धंदा - नौकरी, तंत्रज्ञ, वर्ग ३, नेमणुक - जेऊर बाईजाबाई, सेक्शन , अहमदनगर. रा. इमामपुर गणपती मंदिर जवळ, ता.नगर, जि.अहमदनगर.

२) शिरीष रावसाहेब भिसे, वय- ४५, धंदा- नौकरी, मदतनीस (बाह्य स्त्रोत  कर्मचारी) म.रा.वि.वि.कंपनी,बायजाबाई जेऊर, सेक्शन ता .नगर.

रा.खोसपुरी, ता. नगर, जि.अहमदनगर.  

 लाचेची मागणी- ७००००/-₹ तडजोडी अंती ₹ ६००००/- 

 लाच स्विकारली  ६००००/ ₹

 हस्तगत रक्कम- ६००००/-रु

 लाचेची मागणी - ता.०३/०१/२०२२

 लाच स्विकारली -ता. ०३/०१/२०२२

   लाचेचे कारण -.तक्रारदार यांचे पाढरीपूल येथे हॉटेल असुन हॉटेल चे येणारे विद्युत बील हे दर महिन्याला कमी येईल अशी व्यवस्था उपकार्यकारी अभियंता कोपनर यांना सांगुन कायमस्वरूपी करुन देण्यासाठी  यातील दोन्ही आरोपी  लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे ₹ ७००००/- ची मागणी केली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये दोन्ही आरोपी लोकसेवक यांनी पंचासमक्ष  ७००००/- ₹ लाचेची  मागणी करुन तडजोडी अंती ₹ ६००००/- स्विकारण्याचे मान्य केले. आज रोजी आयोजित केलेल्या लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम ₹ ६००००/- शिवलीला भेळ सेंटर, पांढरीपूल येथे आरोपी नं. २ यांनी पंचासमक्ष स्विकारुन आरोपी नं. १ यांचे कडे दिली असता दोन्ही आरोपी लोकसेवक यांना रंगेहाथ पकडले आहे. एम आय डी सी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची की कार्यवाही सुरू आहे.

 हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

 सापळा अधिकारी:- शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर

  पर्यवेक्षण अधिकारी* हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर

सापळा पथक:- पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे, पो हवा. संतोष शिंदे, पो नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल. पो अंमलदार  वैभव पांढरे, रविंद्र निमसे, महिला पोलिस अंमलदार संध्या म्हस्के, राधा खेमनर,चालक पो ह. हरुन शेख, राहुल डोळसे.

मार्गदर्शक -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

मा. नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.

मा:- सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

आरोपीचे सक्षम अधिकारी: कार्यकारी अभियंता, म.रा वि वि कं मर्यादित.शहरविभाग, नगर, जि- अहमदनगर .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post