नगर शहरातील भाजी विक्रेत्यास कोयत्याने मारहाण

 नगर शहरातील भाजी विक्रेत्यास अडवून  लुटणार्‍या चौघा चोरट्यांना पकडले नगर- भाजी-पाला खरेदीसाठी मार्केटयार्ड- मधील भाजी मार्केटमध्ये पहाटेच्या सुमारास चाललेल्या शहरातील भाजी विक्रेत्यास अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार करत लुटणार्‍या चौघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत पकडले आहे. 

नगरमधील भाजी विक्रेते बाळासाहेब उर्फ सतीश नारायण तरोटे (वय 59, रा.सातभाईगल्ली, चितळेरोड) हे सोमवारी (दि.10) पहाटे 5.30 च्या सुमारास घरुन मार्केटयार्ड मधील भाजी बाजारात भाजीपाला आणण्यासाठी जात असताना त्यांना कोर्टगल्लीतील दादा चौधरी शाळेसमोर अडवून लुटण्यात आले होते. यावेळी त्यांच्या दोन्ही हातांवर कोयत्याने वार करण्यात आले होते. 

याबाबतचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर कोतवाली पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत लुटणार्‍या आरोपींचा कसून शोध सुरू केला होता. ही लुटीची घटना या परिसरात असलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाली होती. ते फुटेज पाहून स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गोरे कर्मचारी राजू वाघ, संजय खंडागळे, बापू फोलाणे, भीमा खर्से, कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे, उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे, गुन्हे शोध पथकातील योगेश भिंगारदिवे, योगेश कवाष्टे, अभय कदम, दीपक रोहोकले, संतोष गोमसाळे, सलीम शेख, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, गणेश धोत्रे, अमोल गाडे, आदींच्या पथकाने संयुक्त कारवाई करत चौघा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याची पोलिसांकडून सांगण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post