नगर तालुक्यातील घटना महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन केले आत्महत्येस प्रवृत्त

 चारित्र्यावर संशय घेऊन केले आत्महत्येस प्रवृत्त
अहमदनगर -महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत शारिरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना नगर तालुक्यातील वाळुंज पारगाव येथे घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह भायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुभांगी शरद काकडे (वय २१, रा. वाळुंज पारगाव, ता. जि. अहमदनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपींमध्ये मयत शुभांगी काकडे यांचा पती शरद गोरख काकडे आणि भाया रविंद्र गोरख काकडे यांचा समावेश आहे. या संदर्भात वैशाली हरिश्चंद्र गुलदगड (रा. सिव्हील हडको, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.दि. ६ जानेवारी रोजी रात्री अडीचच्या दरम्यान ही घटना घडली. शुभांगी काकडे सासरी नांदत असताना आरोपी शरद काकडे आणि रविंद्र काकडे हे त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत होते. तसेच जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावत होते. आरोपी शरद काकडे याला पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी न दिल्याने शारिरिक आणि मानसिक छळही करण्यात येत होता. पती आणि भायाच्या छळाला कंटाळून शुभांगी काकडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. उपनिरीक्षक बोराडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post