माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारच...इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य, तृप्ती देसाईंनी केली कारवाईची मागणी

माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारच...इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य, तृप्ती देसाईंनी केली कारवाईची मागणी



नगर :  कीर्तनकार निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज हे नव्या वादात अडकले आहेत. पुन्हा त्यांनी कोरोनावर  वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांवर कारवाई व्हावी अशी सरकारकडे मागणी केली आहे. 

इंदुरीकर यांनी काही दिवसांपूर्वी पूत्रप्राप्तीसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू आहे. अशातच आता त्यांनी कोरोनासंसर्गाबद्दल वक्तव्य केले आहे. इंदुरीकर महाराज म्हणाले की, मी माळकरी असल्याने मला कोरोना होणार नाही मात्र माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारच, असे वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकरांनी कीर्तनातून केले. मात्र अशा वक्तव्याने ते समाजात अंधश्रद्धा पसरवत असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या की, मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारचं असे सांगून कीर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर अंधश्रद्धा पसरवत आहेत. कोरोना ही महाभयंकर महामारी असून सध्या तिसरी लाट आपल्या देशात आहे. याआधी अनेक जणांना कोरोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे तर अनेक जण मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच सरकार सुद्धा जनजागृती करत आहेच, परंतु स्वतःला कीर्तनकार म्हणविणारे इंदुरीकर पुन्हा एकदा असे वक्तव्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post