भाऊसाहेब जाधव डाक विभागाचे वतीने सुकन्यासाथी म्हणून गौरवित

 श्री भाऊसाहेब जाधव  हे डाक विभागाचे वतीने  सुकन्यासाथी म्हणून गौरवितअहमदनगर:भारतीय डाक विभागाचे वतीने दि 7 ऑक्टोबर 21 ते 31डिसेंबर 2021 या कालावधीत,डाक विभागाचे वतीने खास मुलीकरिता असलेल्या सुकन्यासमृद्धी योजनेची विशेष मोहीम या कालावधीत अहमदनगर विभागात राबविण्यात आलेली होती. 

या मोहिमेत अहमदनगर विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. काही कर्मचाऱ्यांनी या योजनेत उल्लेखनिय काम केले त्यामध्ये अहमदनगर प्रधान डाकघरातील पोस्टमन म्हणून कार्यरत असणारे  श्री भाऊसाहेब विठोबा जाधव यांनी उल्लेखनिय कामगिरी केली त्यानी या कालावधीत आपले नित्याचे टपाल वाटपाचे कामकाज करत या मोहिमेअंतर्गत 91 सुकन्या समृद्धी खाते उघडत उल्लेखनिय कामगिरी केली. अहमदनगर विभागात या दरम्यान 7742 नवीन खाते उघडले गेले.या मोहिमेत 25 नवीन खाते उघडणाऱ्या 135 कर्मचाऱ्यास  सुकन्यासाथी म्हणून पात्र ठरले आहेत. या योजनेस मोहिमेत मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता ही मोहीम दि 11 जानेवारी पर्यत मुदत वाढविण्यात आलेली आहे.


 या मोहिमेत उल्लेखनिय कामगिरी करणारे श्री भाऊसाहेब विठोबा जाधव पोस्टमन अहमदनगर प्रधान डाकघर यांचा विशेष गौरव पोस्टल संघटनेचे नेते श्री संतोष यादव यांनी करून श्री जाधव करत असलेल्या कामाचे कौतुक करत,श्री जाधव यांचे प्रमाणे सर्वांनीच आपले योगदान द्यावे असे आवाहन करत, श्री जाधव हे डाक विभागाचे कर्तव्यदक्ष  कर्मचारी आहेतअसे  सांगत  त्याचा सत्कार केला यावेळी  पोस्टमन संघटनेचे अध्यक्ष श्री नामदेव डेंगळे,श्री सुनील थोरात,श्री विजय दरंदले,नितीन खेडकर,श्री अंबादास सुद्रीक,बाबासाहेब बुट्टे हे उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post