मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना ‘मनसे’ पाठिंबा, राज ठाकरे म्हणतात...आता कच खाऊ नका..

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना ‘मनसे’ पाठिंबा, राज ठाकरे म्हणतात...आता कच खाऊ नका.. मुंबई: राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे फलक म्हणजेच पाट्या मराठी भाषेत असाव्यात, या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वागत केले आहे. राज ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करुन राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. मात्र, आता कच खाऊ नका. या निर्णयाची अंमलबजावणी नीट करा, असा सल्लाही राज ठाकरे यांनी महाविकासआघाडी सरकारला दिला आहे. राज ठाकरे यांच्या निवेदनाची प्रत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post