जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महादेव पालवे कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित

 महादेव पालवे कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित नगर तालुक्यातील जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ महादेव पालवे यांचा पंचायत समितीच्या वतीने  कोरोना योध्या म्हणून सन्मान करण्यात आला आहे.

     महादेव पालवे यांनी कोरोना च्या पहिल्या लाटे पासून स्वतः रक्तदाबाचे रुग्ण असताना चास येथिल कोविड केअर सेंटर तसेच जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात विक्रमी आरटीपीसीआर व रॅपिड एंटीजन टेस्ट केलेल्या आआहे. सुट्टीच्या दिवशी देखील महादेव पालवे टेस्टिंग करण्यासाठी सदैव हजर राहत होते.     तसेच तालुक्यातील इतर प्रयोग शाळा तंत्रज्ञांना नेहमी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. महादेव पालवे यांनी सर्वात जास्त कोरोना टेस्टिंग केल्याबद्दल त्यांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

    कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे, जेऊर वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कर्डिले, डॉ. पूजा आंधळे तसेच जेऊर आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post