काशीकापडी समाजाचे आदर्श उदाहरण...विधवा व विधूर दाम्पत्याचा पुनर्विवाह

 काशीकापडी समाजाचे आदर्श उदाहरण

विधवा व विधूर दाम्पत्याचा

पुनर्विवाह उत्साहात संपन्न! नगर : काशीकापडी समाजातील शिर्डी येथील एक विधवा महिला अंजली लक्ष्मण कोलकर (वाटमकर) व इगतपुरी येथील एक विधूर पुरुष अतीश किसनराव करपे यांचा पुनर्विवाह शिर्डी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या मोजक्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. काळाची गरज ओळखून दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी दाखविलेल्या समजदारीबद्दल समाजातून या विवाहाचे कौतुक करण्यात येत आहे.

हा विवाह होण्यासाठी समाजातील ज्येष्ठ सदस्य सर्वश्री रमेश भिंगारे, माजी नगरसेवक रामा भिंगारे, माजी नगरसेवक सुनील भिंगारे, सुनील गादेकर, औदुंबर गंगेकर तसेच नगरचे समाजातील पदाधिकारी राजू वाडेकर, विनोद भिंगारे, अंकुश भिंगारे, राजू भिंगारे,  विजय वाडेकर, अनिल भिंगारे, विजय उपळकर, गणेश भिंगारे आदींनी पुढाकार घेतला. मुलीचे वडील लक्ष्मण विश्‍वनाथ कोलकर व मुलाकडून ज्येष्ठ बंधू सतीश करपेकर यांनी पंचमंडळींच्या पुनर्विवाहाच्या प्रस्तावाला होकार दिला आणि मुला-मुलीची संमती घेऊन व तेथेच पसंती घेऊन त्याच ठिकाणी विवाह संपन्न झाला.

विवाह सोहळ्यास शिर्डी येथील कार्यकर्ते मंगेश वाडेकर, दिगंबर वाडेकर, शेखर कोलकर, निलेश वाडेकर, सागर वाडेकर यांनीही संमती दिली. मुलगी व मुलगा यांना सध्याच्या काळात जीवनातील प्रश्‍न एकट्याने सोडविणे तसे जिकिरीचे आहे. यासाठी घरच्या व कुटुंबातील विश्‍वासू सदस्याची साथ असणे महत्त्वाचे आहे. याचा विचार करून हा विवाह संपन्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावास बैठकीतील सर्व सदस्यांनी एकमुखाने मान्यता दिली. मुलीला प्रथम पतीपासून एक मुलगा व अतीश करपे यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा व एक मुलगी आहे.

विवाहप्रसंगी पुनर्वधू-वरांना आशीर्वाद देताना काशीकापडी समाजाचे अध्यक्ष रमेश भिंगारे यांनी समाजातील विवाहेच्छू, पुनर्विवाह करू इच्छिणारे विधवा-विधूर अशा जोडप्यांसाठी समाजाने पुढाकार घेऊन त्यांना सुखाचा संसार उभा करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. याकामी आपलेही मोठे योगदान देण्याची तयारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अंजली कोलकर व अतीश करपे या नवदाम्पत्याला त्यांनी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा विवाह घडवून आणण्यासाठी व संपन्न होण्यासाठी समाज कार्यकारिणीतील पदाधिकारी रमेश भिंगारे, विनोद भिंगारे, अंकुश भिंगारे, राजू भिंगारे, सुनील भिंगारे, विजय वाडेकर, विजय उपळकर, अनिल भिंगारे, अविनाश भिंगारे, युवराज भिंगारे, अमोल भिंगारे आदींनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post