आ.रोहीत पवार म्हणतात...पंकजा मुंडे यांच्यासाठी खुर्ची सोडायला तयार....

 

 आ.रोहीत पवार म्हणतात...पंकजा मुंडे यांच्यासाठी खुर्ची सोडायला तयार....



झी मराठीवर 15 डिसेंबरपासून किचन कल्लाकार  हा शो सुरू झाला आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक मोठमोठ्या कलाकारांनी तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी देखील हजेरी लावली आहे. आता किचन कल्लाकारमध्ये राजकीय खिचडी शिजणार आहे. यावेळी शोमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे तसेच कॉंग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे हजेरी लावणार आहेत. याचा नुकताच प्रोमो आऊट झाला आहे.



झी मराठीनं इन्स्टावर किचन कल्लाकारचा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये शोमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे तसेच कॉंग्रेस नेत्या प्रणिती शिंदे दिसत आहेत. शोमध्ये संगीत खुर्चीचा खेळ रंगल्याचे दिसत आहे. यावेळी रोहित पवार यांनी प्रणिती शिंदे व पंकजा मुंडे यांच्यासाठी खुर्चीचा त्याग केला.मात्र यावेळी त्यांनी रोहित पवार म्हणाले की, मी त्याग केला पण मला त्या खुर्चीसाठी मला मदत करायची आहे. यानंतर हा खेळ प्रणिती शिंदे या जिंकतात. त्यावेळी प्रणिती शिंदे यांना युतीविषयी विचारण्यात आलं. तेव्हा त्या गमतीनं म्हणाल्या की, मला माझ्या वरिष्ठांशी बोलावे लागेल..त्यांच्या या एका वाक्यावर सगळीकडे हास्य पसरते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post