नगर जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून निर्बंध लागू, जिल्हा प्रशासनाचे आदेश

  

नगर जिल्ह्यात  सोमवारी मध्यरात्रीपासून निर्बंध लागू, जिल्हा प्रशासनाचे आदेश
स्वीमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्यूटी सलून्सबंद राहतील.
हेअर कटींग सलून1.     50 टक्के क्षमता

2.     रोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील.

3.     एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील.

4.     हेअर कटींग सलून्सनी कोव्हिडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन करावे तसेच केस कापणाऱ्या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे.

खेळांच्या स्पर्धा1. आधीच जाहीर केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खालील नियमांचे पालन करून सुरू राहतील

1. प्रेक्षकांना बंदी

2. सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी बायो-बबल

3. सहभागी होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंसाठी भारत सरकारचे नियम लागू राहतील.

4. सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी दर तीन दिवसांनी आरटीपीसीआर/आरएटी

2. शहर किंवा जिल्हा पातळीवर खेळांच्या शिबिरांना, स्पर्धांना, कार्यक्रमांच्या आयोजनाला बंदी.

एन्टरटेनमेंट पार्क, प्राणिसंग्रहालये, वस्तूसंग्रहालये, किल्ले आणि अन्य सशुल्क ठिकाणे/नागरीकांसाठीचे कार्यक्रमबंद राहतील
लग्नसमारंभकमाल 50 व्यक्ती
अंत्यविधीकमाल 20 व्यक्ती
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमकमाल 50 व्यक्ती
शाळा आणि कॉलेज

कोचिंग क्लासेस

खाली दिलेल्या बाबी वगळता 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.

1.     विविध शैक्षणिक बोर्डांकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम.

2.     प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त करायचे कामकाज.

3.     शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि अन्य वैधानिक प्राधिकरणांकडून  राबविण्यात येणारे किंवा परवानगी दिलेले उपक्रम.

4.     या निर्बंधांना अपवादाच्या स्थितीत हे विभाग आणि प्राधिकरणांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागेल.

नागरीकांचे बाहेर फिरणे1. पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत बंदी.

2. पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासाठी रात्री 11 पर्यंत ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी.

शासकीय कार्यालये1.     महत्त्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीविना आगंतुकांवर बंदी.

2.     कार्यालय प्रमुखांनी नागरीकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेची व्यवस्था करावी.

3.     बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीची व्यवस्था

4.     कार्यालय प्रमुखांच्या गरजेनुसार वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे तसेच गरजेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करणे. याकरिता कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या वेळांमध्ये बदलाचाही विचार करू शकतील.

5.     कार्यालय प्रमुखांनी कोविडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन केले जाईल, याची काळजी घ्यावी.

6.     कार्यालय प्रमुखांनी थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post