करोनावर मात करत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील सक्रीय...केला 'या' मोहिमेचा शुभारंभ

 करोनावर मात करत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील सक्रीय...केला 'या' मोहिमेचा शुभारंभमहाविकास आघाडी सरकारने आणलेल्या विद्यापीठ सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी भाजपच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली आहे.यासाठी भाजयुमोच्या वतीने मुख्यमंत्र्यांना  १ लाख पत्र पाठविण्याचे आंदोलन करण्यात राज्यात सुरू करण्यात आले.शिर्डी विधानसभा मतदारसंघातून पत्र पाठविण्याच्या या आंदोलनाची सुरूवात भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.याप्रसंगी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सतिष बावके, उपाध्यक्ष राहूल घोगरे ,सचिव सचिन शिंदे ,रविंद्र गाढे ,पंकज गोर्डे ,अतुल बोठे ,उमेश कासार ,ॠषिकेश खांदे,मनोहर मते,रविंद्र बेंद्रे, निखील कडू ,राहूल कोते ,विजय मापारी राहूल गोरे, मिलींद बनकर,व ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post