जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका ५ महिने लांबणीवर, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा अंदाज

 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका ५ महिने लांबणीवर, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा अंदाजनगर: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका  साधारणपणे पाच महिने पुढे जाण्याचा अंदाज राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. 17 तारखेला सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी मध्यप्रदेशसह  महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहे. आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा संकलित करण्यासाठी पाच कोटी उपलब्ध करून देण्यात आला असून 475 कोटींची पुरवणी मागणी करण्यात आली. यातून साधारण चार महिन्यांत हा डेटा उपलब्ध होवू शकतो. त्यानंतर ओबीसी आरक्षण लागू होवू शकते. यामुळे साधारणपणे पाच महिने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका पुढे जावू शकतात असा माझा अंदाज असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post