पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी गंभीर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली चौकशीची मागणी

 

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी गंभीर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली चौकशीची मागणीमुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक आढळली होती. शेकडोंच्या जमावाने भर रस्त्यावर येत मोदींचा ताफा अडवला होता. त्यामुळे मोदींची पंजाबमध्ये होणारी सभा  रद्द करण्यात आली होती. मोदी पंजाबमध्ये सभा न घेताच परतले होते. या घटनेचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसचे  सरकार आहे. त्यामुळे भाजपकडून काँग्रेसवर टीका केली जातेय. या घटनेवरुन महाराष्ट्रातही काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आल्याचं चित्र बघायला मिळतंय. पण या घटनेप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केल्याचं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post