जगतापांकडून दहा हजार महिलांना संक्रांतीचे वाण...

जगतापांकडून दहा हजार महिलांना संक्रांतीचे वाण... नगर- श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करणाऱ्या माजी आमदार राहुल जगताप  यांच्या मातोश्री अनुराधा कुंडलिकराव जगताप व पत्नी डॉ. प्रणोती राहुल जगताप यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या सभासद महिलांची संक्रात गोड झाली आहे. सभासदांच्या घरातील महिलांना या दोघी सासु-सुनांनी दहा हजार साड्यांची घरपोच भेट दिली.

 कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. निवडणूक झाली नसली तरी सभासदांना आगळी वेगळी भेट देण्याची संकल्पना अनुराधा जगताप व डॉ. प्रणोती जगताप यांनी राहुल जगताप यांच्याकडे व्यक्त केली. संक्रात आली आहे. सभासदांच्या कृपेने निवडणूक बिनविरोध पार पडली त्यामुळे आपण प्रत्येक सभासद कुटुंबाच्या घरी तिळगुळाचा गोडवा पोच करतानाच महिलांना सौभाग्यलेणे देवू अशी संकल्पना मांडली. अनुराधा जगताप यांनी कुंडलिकराव तात्या जगताप यांचा कुकडी उभारणीतील संघर्ष जवळून पाहिला आहे. तात्यांनी कायमच सभासद हिताला प्राधान्य दिले आहे. याच जाणीवेतून तात्यांची आठवण म्हणून जगताप कुटुंबाने सभासदाच्या घरात साड्या पोच करण्याचे ठरविले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post