रविवारी व सोमवारी कृष्णाजी बाबांचा यात्रोत्सव , कोरोना च्या पार्श्वभूमीवर दर्शन व धार्मिक विधी करण्यास परवानगी

 रविवारी व सोमवारी कृष्णाजी बाबांचा यात्रोत्सव कोरोना च्या पार्श्वभूमीवर दर्शन व धार्मिक विधी करण्यास परवानगी

 सोनगाव-  अनापवाडी येथील सोनगाव पंचक्रोषीचे आराध्यदैवत श्री संत कृष्णाजी बाबांचा यात्रोत्सव सालाबाद प्रमाणे येत्या रविवारी व सोमवारी 9 व 10 जानेवारी रोजी संपन्न होत आहे. परंतु या वर्षीचा यात्रोत्सव साधेपणाने पार पडणार आहे .यात्रेमध्ये दुकानदारांना दुकाने लावण्यास बंदी करण्यात आली आहे. सोशल डिस्टंसिंग व शासनाचे सर्व नियम पाळून बाबांच्या दर्शनासाठी व पूजाविधी साठी येणाऱ्या भाविक भक्तांना मंदिर खुले राहील..अनापवाडी येथील श्री संत कृष्णाजी बाबा हे एक जागृत देवस्थान असून ग्रामीण भागातील असूनही अनापवाडीचा यात्रा उत्सव जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. बाबांच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून व पर जिल्ह्यातून अनेक भाविक भक्त, माता-भगिनी दरवर्षी मोठ्या आनंदाने येत असतात .परंतु यावर्षी कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे अनेक गावच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहे. त्याच धर्तीवर यावर्षीचा कृष्णाजी बाबांचा यात्रोत्सव साधेपणाने करण्यात येईल..त्यामुळे दरवर्षी येणारे दुकानदार,  हलवाई, कटलरी व्यावसायिक यांनी यात्रेत येऊन दुकाने लावण्यास यात्रा कमिटीने बंदी घातली आहे . दरवर्षी यात्रेत होणारा तमाशा व नामवंत कुस्त्यांचा जंगी हगामा रद्द करण्यात आला आहे.मात्र कृष्णाजी बाबांच्या दर्शनासाठी , पूजा पाठ, नवस पूर्ती, व धार्मिक विधीसाठी येणार्‍या भाविक भक्तांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करून दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे ,अशी माहिती यात्रा कमिटी व देवस्थानच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post