नागवडे कारखाना निकाल...राजेंद्र नागवडे यांनी उधळला गुलाल...

 

नागवडे कारखाना निकाल...राजेंद्र नागवडे यांनी उधळला गुलाल...नगर : श्रीगोंदा तालुक्यात शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे  व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या समर्थकांत थेट लढत आहे.  शुक्रवारी मतदान प्रक्रिया झाली. आज मतमोजणी सुरू असून नागवडे यांचे किसान क्रांती मंडळ आघाडीवर असल्याचे चित्र आहे. बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया झाल्याने मतमोजणीसाठी वेळ लागत आहे. 

दुपारपर्यंत 21 जागांपैकी 9 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. या सर्व 9 जागांवर राजेंद्र नागवडेच्या किसान क्रांती मंडळाने विजय मिळविला आहे. हे सर्व विजयी उमेदवारांनी सहकार विकास मंडळाच्या उमेदवारांचा अडीच ते तीन हजार मतांच्या फरकाने पराभव केला आहे. राजेंद्र नागवडेही आघाडीवर असल्याचे चित्र असल्याने नागवडे समर्थक उत्साहात आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post