...तर आमदारकीचा राजीनामा देणार शिवसेना आमदाराच वक्तव्य

...तर आमदारकीचा राजीनामा देणार शिवसेना आमदाराच वक्तव्य ठाणे : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर ए राजीव यांनी सूडबुद्धीने छाब्बया विहंग गार्डन या गृहसंकुलातील बांधकाम तांत्रिकदृष्ट्या बेकायदा ठरविले होते. परंतु राज्य सरकारने दंड माफ करून आम्हाला न्याय दिला आहे, असा दावा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच बांधकाम एक इंचही अनधिकृत असेल तर आमदार पदाचा राजीनामा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास खाते होते, त्यावेळेस नगरविकास खात्याने विहंग गार्डन मध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाले नाही असे स्पष्ट केले होते. याबाबत महापालिका स्तरावर निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले होते. याबाबत शिवसेनेच्या जोरावर खासदार झालेल्या किरीट सोमय्या आणि भाजपवाल्यांनी अभ्यास करून बोलावे, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. किरीट सोमय्या यांना दंड किती होता हे देखील माहिती नाही, अशी टीकाही त्यांनी केली.आरक्षित भूखंड आणि तो विकसित करून दिल्यास टीडीआर देण्याची योजना होती.आरक्षित भूखंडवर शाळेचे बांधकाम करून दिले. परंतु ती शाळा पालिकेने हस्तांतरित केली नाही. त्यामुळे तांत्रिक दृष्टीने विहंग गार्डनचे बांधकाम बेकायदा ठरविले गेले. जितके चटई क्षेत्र मिळणार होते, तितकेच बांधकाम केले आहे. त्यामुळे इथे एक इंचही बेकायदा बांधकाम नाही. अशाचप्रकारे इतर विकासकांनी बांधकामे केली आहेत, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. तत्कालीन आयुक्त आर ए राजीव यांनी केवळ सूडबुद्धीने ही कारवाई केली, असे सरनाईक यांनी सांगितले. झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी राजीव यांनी नोटिसा काढल्या होत्या. त्या विरोधात भूमिका घेतली. तसेच राजीव यांनी केलेल्या भ्रष्टाचार बाहेर काढला. त्यामुळेच माझ्यावर सूडबुद्धीने त्यांनी ही कारवाई केली होती, असेही त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post