नगरमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी, वाहनांची तोडफोड

 सलूनमध्ये नंबर लावण्यावरुन वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी, वाहनांची तोडफोड, नगरमध्ये पोलीस बंदोबस्तअहमदनगर : शहरातील पीरशहा खुंट येथे क्षुल्लक कारणावरुन दोन गटांत जोरदार भांडण झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या भांडणाने टोकाचे स्वरुप धारण केल्यानंतर येथे दगडफेकदेखील झाली.मिळालेल्या माहितीनुसार पीरशहा खुंट येथे एका सलूनच्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणावरून हा किरकोळ वाद झाला. नंतर या वादाने उग्र स्वरुप धारण केले. त्यातच दोन गट आमनेसामने आले


.या हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन गटातील या भांडणात बाजूला उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोडही करण्यात आली.घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ होत दोन्ही बाजूच्या जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणानंतर आता पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला गेलाय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post