आ.निलेश लंके यांची वचनपूर्ती...शब्द दिल्याप्रमाणे चर्चला केली मदत

आ.निलेश लंके यांची वचनपूर्ती...शब्द दिल्याप्रमाणे चर्चला केली मदत पारनेर-  पारनेर येथील ख्रिश्चन बांधवांचे प्रार्थनास्थळ असणारे "चर्च" मध्ये काही दिवसापूर्वी आ.निलेश लंके तिथे भेट दिली असता तेथे चोरीचा प्रकार झाला होता. हे निदर्शनास आले त्याक्षणीच त्यांना शब्द दिला की येत्या नाताळात चोरीला गेलेले साहित्य माझ्या स्वतःच्या मानधनातून पारनेर येथील ख्रिश्चन धर्मगुरू यांच्या मागणी नुसार चर्च साठी हे सर्व साहित्य चर्चसाठी भेट म्हणून देईल व तीच शब्दपुर्ती करत सदर प्रार्थना स्थळाला साउंड सिस्टीम मशीन-१, साउंड-२, माईक-२, माईक स्टँड-२, साउंड सिस्टीम वायर-१ बंडल हे ख्रिश्चन बांधवांसाठी देण्यात आले.शब्द पूर्णत्वास नेऊ शकलो याच समाधान आहे.

श्री.निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेच्या वतीने किराणा किट वाटप करण्यात आले. तसेच पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील २७ ख्रिश्चन बांधवाना यांना किमान २०००- रुपये किंमतीचे किराणा किटचे वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित मा.पंचायत समिती सभापती गंगाराम बेलकर,राहुल झावरे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माहिती तंत्रज्ञान प्रमुख जितेश सरडे,डॉ.बाळासाहेब कावरे,पोटघन मेजर,बापू शिर्के,सतीश भालेकर,श्रीकांत चौरे, व मा. निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्षा सौ.सविता ढवळे मॅडम व संपूर्ण महिला संचालक मंडळासह निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध पदाधिकारी हितचिंतक व सहकारी मित्र यावेळी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post