नगरमध्ये चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई

 नगरमध्ये चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई ;महापालिकेने बजावल्या नोटिसानगर - नगरमध्ये राज्यात विक्रीस बंदी असलेल्या चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. शहरात पतंग व मांजा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना महापालिकेने याबाबत नोटिसा बजावल्या आहेत.

मकर संक्रांत जवळ आली असून मकर संक्रातील पतंग उडवण्याचा आनंद घेण्यासाठी शहरात ठीक ठिकाणी पतंग मांजा विक्रीचे दुकाने थाटली आहेत मात्र काही दुकानदार बंदी असलेल्या चायना मांजा विक्री करत आहेत.या मांजा मुळे नागरिकांना गंभीर ईजा होते तर पशुपक्षांचा जीव जातो त्या मुळे या चायना मांजावर कायदेशीर बंदी घालण्यात आली असली तरी चोरी छुपे या मांजाची विक्री सुरूच आहेत.

ही बाब निदर्शनास आल्याने महापालिकेच्या प्रभाग समितीच्या वतीने बागडपट्टी परिसरात पतंग मांजा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना नोटीसा बाजवण्यात आल्या असून जर चायना मांजा विक्री करताना अथवा साठवणूक करण्यात आला असल्याचे आढळून आल्यास त्या विक्रेत्यावर दंडात्मक करवाईसह फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची नोटिसा महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य स्वछता निरीक्षक एन. टी. भांगरे, स्वछता निरीक्षक प्रशांत रामदिन यांनी बजावल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post