एसटी बसचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

एसटी बसचा भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू बीड : लातूर-औरंगाबाद एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर आठ प्रवासी जखमी झाले आहेत. बस आणि ट्रक यांची धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे बस अपघाताची घटना घडली.


रविवारी सकाळी लातूर-अंबाजोगाई रोडवर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लातूर-औरंगाबाद ही बस लातूरहून निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post