२५ वर्ष नगर तालुक्यात विकास करता आला नाही अशांना आमदारकी कशाला? प्रा ‌शशिकांत गाडेंचा टोला

२५ वर्ष नगर तालुक्यात विकास करता आला नाही अशांना आमदारकी कशाला? प्रा ‌शशिकांत गाडेंचा टोला

 नगर पंचायत समितीचा पुरस्कार वितरण सोहळा उत्सहात नगर- तालुक्याला शेती साठी पाणी मिळवण्यासाठी सकाळी पाणी योजना व पिंपळगाव जोगा पाणी योजनेच्या माध्यमातून पाणी मिळण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा मी मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करत आहे तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी घोसपुरी एमआयडीसी  उभी करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून माझ्या विधानसभेच्या विजयानंतर आजच्या कार्यक्रमाचे निमित्ताने पहिल्यांदा महा विकास आघाडी एकत्र दिसल्याचे प्रतिपादन आ. निलेश लंके यांनी केले. 

नगर तालुका पंचायत समितीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.

यावेळी पंचायत समितीच्या वतीने संजय ठोंबरे (लोकमत ) , लहुकुमार चोभे ( पुढारी ) ,सुनिल हारदे ( नवा मराठा ) अविनाश निमसे ( नगरी दंवडी ) याना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . तसेच महाराष्ट्रात कबड्डी क्षेत्रात योगदान दिल्याबददल शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांना नगर भूषण, कोव्हीड काळात कोरोना रूग्णाची अहोरात्र सेवा केल्याबद्दल आ. निलेश लंके यांचा कोव्हीड योद्धा पुरस्कार , बास्को ग्रामीण विकास संस्थेने सामाजीक कार्यात केलेल्या कामामुळे सामजीक पुरस्कार देण्यात आला . तसेच आरोग्य विभागात ज्योती तोडमल, रेणुका बेलोटे, शोभा अहिरवाडी , अंगणवाडी विभागात दिपाली काळे, शिक्षण विभागात संतोष गवळी , शरद धलपे, ग्रामसेवक विभागात राहुल गांगर्डे, नंदराम कोतकर तसेच इतर विभागातील चाळीस  कर्मचाऱ्याना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, माजी आमदार कै किंवा काका म्हस्के यांनी नगर तालुक्यात पाझर तलाव यांसह इतर विकास कामे केली कैलासवासी दादा पाटील शेळके यांनी नगर तालुक्यात 67 शैक्षणिक संस्था उभ्या केल्या नगर कारखाना नगर बाजार समिती नगर तालुका खरेदी विक्री संघ नगर जिल्हा दूध संघ अशा सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हातात तालुक्यात अर्थकारण खेळती ठेवली दुर्दैवाने मागील पंचवीस वर्षात नगर तालुक्यात दाखवण्याचा कुठल्याही विकास कामे होऊ शकले नाही आता त्यांना परत कशाला आमदारकी पाहिजे असे म्हणत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना विधान परिषदेच्या मुद्द्यावरून टोला लगावला यावेळी सभापती सुरेखा गुंड , जिल्हा परीषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे , बाळासाहेब हराळ , संपत म्हस्के , गटविकास अधिकारी रेश्मा होजगे, प्राविण कोकाटे , रविंद्र भापकर ,राजेंद्र भगत ,संजय कळमकर , बापुसाहेब तांबे, गोरक्षनाथ काळे, दत्ता नारळे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप गुंड , सूत्रसंचालन उध्दव काळा पहाड , आभार रविंद्र भापकर यांनी मानले .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post