योगींच्या बड्या मंत्र्यांचा राजीनामा... उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ

 

योगींच्या बड्या मंत्र्यांचा राजीनामा... उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळलखनौ- उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मोर्या यांनी राजीनामा दिला आहे. भाजपवर गंभीर आरोप करत त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सेवायोजन आणि समन्वय मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्या यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण ढवळून निघालं आहे. दरम्यान, भाजपलाही या राजीनाम्यानं धक्का दिला असून आता त्यांची समजून काढण्यासाठी भाजपनं मौर्या आडनावाच्याच दुसऱ्या एका नेत्याला कामाला लावलं आहे. अमित शहा यांना स्वामी प्रसाद मौर्या यांच्या राजीनामानंतर आमदारकीचा राजीनामा दिलेल्या नाराज नेत्यांची समजून काढण्यासाठी आणि त्यांचं मनपरिवर्तन करण्यासाठी केशव प्रसाद मौर्या यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. भाजपवर गंभीर आरोप करत स्वामी प्रसाद मौर्या यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारण खळबळ उडवून दिली आहे.

राजीनामा दिलेल्या स्वामी प्रसाद मौर्या यांनी भाजपवर गंभीर आरोप करणारं एक ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये ‘दलित, मागासलेले, शेतकरी, बेरोजदार, युवा तसंत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची घोर निराशा झाली असून योगी सरकारच्या काळात त्याची उपेक्षा करण्यात आल्यामुळे मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे’, असं स्वामी प्रासद मौर्यांनी म्हटलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post