ग्रामीण भागातील मुले शिक्षण प्रवाहात आली पाहिजे- सौ हर्षदाताई काकडे

 ग्रामीण भागातील मुले शिक्षण प्रवाहात आली पाहिजे- सौ हर्षदाताई काकडेशेवगाव

 शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शहरटाकळी, ता. शेवगाव, जि. अ.नगर येथे इ.5वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातुन प्रथम येण्याचा बहुमान मिळालेल्या विद्यालयातील व  शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार समारंभ विद्यालयात संपन्न झाला. 

      प्रथमतः विद्येची देवता सरस्वती, कर्मयोगी आबासाहेब काकडे, स्व. निर्मलाताई काकडे यांच्या प्रतिमांचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल मगर यांनी केले.

       उपस्थित अतिथींचे स्वागत शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.

 सिद्धांत जिवडे, सृष्टी म्हस्के, दिशा कापरे, विद्या कोल्हे, दुर्वा काकडे, वैष्णवी कावले,गीतांजली गवळी, ऋषभ शेळके, वैष्णवी नवले,साक्षी खेडकर, कोमल मुंगसे, आदित्य माळवदे, ओम गायधने,अंजली खराडे, समीक्षा उंदरे, तुषार गवळी, कोमल झेंडे व शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी या सर्व 40 विद्यार्थ्यांचा व एन.एम.एम.एस परीक्षा पात्र 4 विद्यार्थी यांचा पालकांसह प्रत्येकास पॅड, तीन स्क्वायरबुक पुष्पगुच्छ कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. हर्षदाताई काकडे सदस्य जि. प. अ.नगर व प्रमुख अतिथी संस्थेचे कार्यकारी अधिकारी लक्ष्मणराव बिटाळ  यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकाचा ही यावेळी सन्मान करण्यात आला.     

       यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी दिशा कापरे, पालक प्रतिनिधी शंकरराव गोसावी, शिक्षक प्रतिनिधी मोहिनी बडदे, व माजी पर्यवेक्षक संजय चेमटे, प्राचार्य संपतराव दसपुते यांची भाषणे झाली. 

          कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लक्ष्मणराव बिटाळ यांनी आपल्या भाषणात या गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केले आहे. त्यांचा पालकांसोबत आज सन्मान होत आहे ही या विद्यालयाची व संस्थेची भूषणावह बाब आहे. या विद्यार्थ्यांना आज हे यश मिळाले आहे त्यात त्यांनी स्वतः कष्ट घेतले शिक्षकांनी मार्गदर्शन पालकांनी सहकार्य केले त्याचे हे फळ आहे या कोरोना काळात विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासमोर ऑनलाइन शिक्षणाचे व स्पर्धा परीक्षेचे खूप मोठे आव्हान होते हे आव्हान स्वीकारून अशा प्रकारचे यश विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे याचा अभिमान वाटतो. शैक्षणिक प्रक्रिया पद्धती, शिक्षण प्रवाह यामध्ये बदल होत आहेत दिवसेंदिवस नवनवीन आव्हाने  समोर येत आहेत आज दहावी-बारावीच्या गुणांवर कोणत्याही कोर्सला प्रवेश मिळत नाही तर नवीन नवीन कोर्सेसला जाण्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रवेश परीक्षांना सामोरे जावे लागते. त्यासाठी आपली गुणवत्ता वाढवावी लागेल आणि अशा शालेय जीवनातील या परीक्षा पुढील येणाऱ्या मोठ्या परीक्षांचा पाया आहे. या स्पर्धा परीक्षेत आपल्याला सिद्ध करून दाखवावे लागेल. आपल्या ध्येयापर्यंत जायचे आहे त्या परीक्षेचे, यशाचे हे  मैलाचे चे दगड आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवून दाखवले आहे याने आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. विविध शाळेतील उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत असते शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास घडवण्याचे काम या विद्यालयातून होत आहे. असे मत व्यक्त करून यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

          अध्यक्षीय भाषणात हर्षदाताई काकडे यांनी शहरातील विद्यार्थ्यांना शिकवणी, क्लासेस ची सुविधा असते पण ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी कोरोना काळात शिक्षक, पालक यांच्यावर विश्वास ठेवून अभ्यास केला व हे यश मिळविले आहे. यामध्ये मुलींचा यशाचा वाटा मोठा आहे मुलांनीही या प्रमाणे यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत एमपीएससी, यूपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षेत इ. 1ली ते 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपण हा शालेय अभ्यासक्रम चांगला अभ्यासावा. अप्रगत मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी, हुशार मुलांना अधिक प्रभावी शिक्षण देण्यासाठी ग्रामीण भागातील मुले शिक्षण प्रवाहात आली पाहिजे यासाठी कर्मयोगी आबासाहेब काकडे शिक्षण संस्था काम करत आहे.

         आर्थिक अडचणीत असणाऱ्या हुशार मुलांना शिक्षणासाठी आपली संस्था काम करत आहेत त्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मदत करण्याचे काम करत आहे. असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात करून यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

पर्यवेक्षिका अंजली चिंतामण व पालक यावेळी उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था प्रतिनिधी अनिल मगर सूत्रसंचालन अलका भिसे, अनिता दारकुंडे अनुमोदन गणेश लबडे,आभार संजय मरकड यांनी व्यक्त केले.

        यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, इ.9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यां समवेत पालक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post