धक्कादायक प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर महिलेला प्रवेश नाही, रस्त्यातच झाली प्रसूती..

 प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर महिलेला प्रवेश नाही, रस्त्यातच झाली प्रसूती..देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेस  दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला खासगी दवाखान्यात  उपचारासाठी चालविले असता तिची रस्त्यातच प्रसुती झाली.दरम्यान तेथील परिसरातील महिलांनी आडोसा करून सुखरूप प्रसुती करून बाळ-बाळंतीणीची सुटका केली. ही घटना आज गुरूवारी सकाळी देवळाली प्रवरायेथे नगरपालिका कार्यालयाजवळ घडली. या घटनेमुळे देवळालीतील नागरिकांनी संताप व्यक्त  केला असून तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांसह आरोग्य कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी केली आहे.दरम्यान रिपाइंचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र थोरात यांनी संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद नगर जिल्ह्यात उमटले असून नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post