उत्तर प्रदेशात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा... भाजपला हादरा

 

उत्तर प्रदेशात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा... भाजपला हादरालखनौ: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशमध्ये राजकीय फोडाफोडीला वेग आला आह़े  स्वामी प्रसाद मौर्य यांच्यापाठोपाठ बुधवारी राज्याचे पर्यावरणमंत्री दारासिंह चौहान या दुसऱ्या प्रबळ ओबीसी नेत्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपनेही वेगाने हालचाली करत बुधवारी समाजवादी पक्ष व काँग्रेसच्या एका आमदाराला प्रवेश दिला़

 ओबीसीतील कुशवाहा समाजाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार रोशनलाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती आणि भगवती सागर आणि विनय शाक्य हे समाजवादी पक्षात अधिकृतपणे प्रवेश करतील. दारासिंह चौहान यांनीही ‘सप’मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. चौहान तसेच पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या अन्य आमदारांशी भाजपच्या वतीने संपर्क साधण्यात आला होता. मात्र, चौहान यांनी भाजप नेतृत्वाची विनंती अव्हेरून मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दोन दिवसांत दोन मंत्री आणि चार आमदारांनी भाजपचा राजीनामा दिला आह़े  दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे हरिओम यादव तसेच काँग्रेसचे नरेश सैनी यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. याखेरीज समाजवादी पक्षाच्या दोन माजी आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला़

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post