'यांना' करोना चाचणीची गरज नाही, केंद्राच्या महत्त्वपूर्ण गाईडलाईन्स जारी

 

'यांना' करोना चाचणीची गरज नाही, केंद्राच्या महत्त्वपूर्ण गाईडलाईन्स जारीनवी दिल्ली: रुग्णसंपर्कातील व्यक्ती अतिजोखमीच्या गटातील नसेल तर त्यास करोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असा दिलासादायक निर्णय केंद्राने घेतला आह़े 

करोना चाचण्यांसंदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या आहेत़  करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींनाही चाचणी करावी लागत़े मात्र, रुग्णसंपर्कातील व्यक्ती वयोवृध्द अणि सहव्याधीग्रस्त नसेल तर चाचणी करण्याची गरज नाही़  तसेच आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांनाही करोना चाचणी बंधनकारक नाही, असे ‘आयसीएमआर’ने स्पष्ट केल़े.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रुग्णांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या़ त्यानुसार करोना संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना बाधित असल्याचे आढळल्यानंतर सातव्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडणे शक्य होणार आहे. रुग्ण बाधित आल्यानंतर सलग तीन दिवस त्याला ताप नसेल तर चाचणी न करता त्याला घरी सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

रुग्णांना घरी सोडल्यानंतर पुढील सात दिवस त्यांनी आपल्या लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे, तसेच घरी राहतानाही मुखपट्टीचा वापर करावा. घरी सोडल्यानंतर ताप, खोकला, श्वास घेण्यात अडचण यांपैकी कोणतेही लक्षण सौम्य किंवा तीव्र स्वरूपात जाणवल्यास त्या रुग्णाने डॉक्टरांशी संपर्क साधावा. मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी सलग तीन दिवस ९३ आणि त्याहून अधिक राहिल्यास त्या रुग्णांना घरी सोडण्यात यावे, असेही या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post