राजेंद्र नागवडे यांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड...'राजेंद्र प्रताप' या भ्रष्टाचार पोलखोल पुस्तिकेंने खळबळ....

 राजेंद्र नागवडे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी लागल्यास ब्रह्मदेव पण त्यांना वाचवण्यासाठी येणार नाही - शेलार.


राजेंद्र नागवडे यांनी मुलांच्या नातेवाईकांच्या नावाने दोन हजार चारशे टन उसाचे बोगस बिल काढले - शेलार

*'राजेंद्र प्रताप'* या भ्रष्टाचार पोलखोल पुस्तिकेंने खळबळ....

सहकार विकास पॅनल च्या प्रचाराचा शुभारंभ....
 सहकार महर्षी श्री शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीगोंदा निवडणूक निमित्त सहकार विकास पॅनल चा प्रचाराचा नारळ बेलवंडी येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांना नारळ वाढवून करण्यात आला.
            यावेळी केशव मगर,अण्णासाहेब शेलार,प्रतिभाताई पाचपुते,जिजबापू शिंदे,शहाजी खेतमाळीस,वैभव पाचपुते,दिलीप रासकर,विकास काकडे,तुळशीराम रायकर,अशोक रहिंज,सुरेखा काळाने,विलास भोसले, सोपान हिरवे,उत्तम डाके,संजय डाके,सुभाष काळाने,भाऊसाहेब मांडे,मुरलीधर ढवळे संदीप तरटे,विश्वनाथ दातिर आदी मान्यवर उपस्थित होते.
          माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी राजेंद्र नागवडे यांचा कारखान्यातील भ्रष्टाचाराचा प्रताप शेतकरी सभासदांसमोर मांडून राजेंद्र नागवडे यांनी कारखान्यात केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लागल्यास ब्रह्मदेव पण त्यांना वाचवण्यासाठी येणार नसल्याचा इशारा देत राजेंद्र नागवडे यांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला.राजेंद्र नागवडे यांनी आपल्या खाजगी मालकीचा कोठेही साखर कारखाना नसल्याचे सांगून कोणीही माझ्या मालकीचा अथवा माझ्या कुटुंबियांच्या नावे साखर कारखाना असल्याचा पुरावा दिल्यास आपण राजकीय सन्यास घेऊ असे जाहीर वक्त्यव्य केले होते त्यानुसार अण्णासाहेब शेलार यांनी भरसभेत राजेंद्र प्रताप या नावाची पुस्तिका दाखवून त्यामध्ये राजेंद्र नागवडे त्यांच्या पत्नी सौ अनुराधा नागवडे यांच्या सुमारे सहा कंपन्यांमध्ये थेट भागीदार असल्याचा पुरावाच पुस्तकाच्या माध्यमातून ऊस उत्पादक सभासदांच्या हातात दिल्याने सभासद मतदारांच्या भुवया उंचावल्या.अमदापूर परभणी येथील श्री लक्ष्मी नरसिंह शुगर एल एल पी या साखर कारखान्यात तसेच सातारा जिल्ह्यातील सुरली कराड येथील श्रीकांत ऍग्रोटेक इंडस्ट्रीज लिमिटेड या गूळ व्यवसायाशी निगडित कारखान्यात राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी अनुराधा राजेंद्र नागवडे या थेट व्यावसायिक भागीदार असल्याचा पुरावा अण्णासाहेब शेलार यांनी सभासदांसमोर ठेवून नागवडे कुटुंबीयांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडला असून कोरोणा काळात सबंध राज्य बंद असताना आणि कोणी रस्त्यावर नसताना 17 लाख रुपयांचे डिझल वापरले आहे. तसेच गेस्ट हाऊसमध्ये 8 लाख रुपयांचा खर्च झाल्याचा दाखवला आहे त्यामुळे येन थंडीत श्रीगोंदयाचे राजकारण चांगलेच तापले आहे.
          राजेंद्र नागवडे यांनी स्वतःच्या मुलांच्या तसेच नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांच्या नावे विविध गावांमधून शेती नसताना सात बारा नसताना वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन हजार चारशे टन उसाची लागवड केल्याचे दाखवून कारखान्याला ऊस गाळप केलाच कसा असा प्रश्न करून नागवडे यांनी कारखान्यात मोठ्या प्रमाणात बोगस बिले काढून सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारला असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले आहे.त्यामुळे नागवडे साखर कारखाना भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सहकार विकास पॅनल च्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन अण्णासाहेब शेलार यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post