अमिताभ बच्चन यांना चक्क सचिन तेंडुलकरची माफी मागावी लागली

अमिताभ बच्चन यांना चक्क सचिन तेंडुलकरची माफी मागावी लागली महानायक अमिताभ बच्चन यांना चक्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची माफी मागावी लागली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये सचिन लेजेंड्स क्रिकेट लीग मध्ये खेळणार असल्याचे म्हटले होते. मात्र सचिन ही स्पर्धा खेळणार नसल्याचे स्पष्टीकरण त्याच्या मॅनेजमेंट टीमने दिले आहे. सचिन तेंडुलकरचा चुकीचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी माफी मागितली आहे. अमिताभ यांनी ते ट्विट आणि व्हिडिओ डिलीटही केला आहे. यानंतर त्यांनी लेजेंड्स क्रिकेट लीगची एक नवीन व्हिडिओ क्लिपही शेअर केली.

अमिताभ बच्चन यांनी शनिवारी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या लेजेंड्स क्रिकेट लीगमध्ये खेळणार असल्याचा उल्लेख केला होता. मात्र, सचिन तेंडुलकरच्या व्यवस्थापनाने सांगितले की, सचिन हा दिग्गज या लीगचा भाग असणार नाही. यानंतर अमिताभ यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी व्हिडिओ डिलीट केला. त्यांनी आपल्या चुकीबद्दल माफीही मागितली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post