५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश...गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश...गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा करोनाने राज्यात कहर केला असताना मुंबई पोलिसांनाही या संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे लोकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात असताना मुंबई पोलिसांना मात्र २४ तास कर्तव्यावर हजर राहावं लागत आहे. यामुळेच त्यांना करोनाचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ७१ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान राज्याचा गृहविभागाने पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला असून त्यांनाही खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येणार आहे.पोलिसांना करोनाची लागण होत असल्याने आता ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश देण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post